MLA Anil Bhosale And four other custody till 6 March 
पुणे

आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना सहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना विशेष न्यायालयाने सहा मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने गुरुवारी (ता. 26) हा आदेश दिला. 

या प्रकरणी सनदी लेखापाल योगेश लकडे (वय 39, रा. नऱ्हे आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने 16 संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आमदार अनिल शिवाजीराव भोसले (वय 55, रा. बाणेर रस्ता), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय 69, रा. कमला नेहरु पार्क), तानाजी दत्तू पडवळ (वय 50, रा. काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले (वय 47, रा. गोखलेनगर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

आझम खान यांना न्यायालयाचा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात

सहायक सरकारी वकील विलास पठारे यांनी आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. अनिल भोसले हे बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, जाधव हे संचालक, पडवळ हे मुख्य कार्यकारी अधिकारी तर, शैलेश भोसले मुख्य हिशेब तपासणीस होते. फिर्यादी यांच्या कंपनीची भोसले बॅंकेच्या लेखापरीक्षणासाठी नेमणूक केली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या पथकानेही बॅंकेच्या रोख शिल्लक रक्कम पडताळणी केली. त्यावेळी शिवाजीनगर शाखेने 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये इतकी रोकड बॅंकेच्या मुख्य शाखेत पाठविल्याचे दाखविले. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या पथकाच्या पडताळणीत भोसले बॅंकेच्या मुख्य कार्यालयाने ही रोख रक्कम स्वीकारलेली नव्हती. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने फिर्यादीच्या कंपनीला बॅंकेची रोख रक्‍कम पडताळणी करण्यासाठी नेमले. त्यात प्रथमदर्शनी आरोपींनी 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. बॅंकेतील गैरव्यवहार, आरोपींची बॅंक खाती आणि मालमत्तेबाबत चौकशी करायची आहे. या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आरोपींकडून हस्तगत करायची आहेत. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) हे कलम वाढविण्यात आले आहे. 1187 ठेवीदारांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असून, ही रक्कम 52 कोटी 93 लाख रुपये आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता चौकशीसाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पठारे यांनी केली. 

इंदूरीकरांच्या किर्तनाला गेल्या अन्...

आरोपींच्या वतीने एस. के. जैन, हर्षद निंबाळकर, बिपीन पाटोळे, ऋषिकेश गानू, यशपाल पुरोहित आणि विराज पाटोळे यांनी बाजू मांडली. आरोपींकडून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केले जात आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. 

आरोपींना विशेष वागणूक नको 
आमदार भोसले यांना कोठडीदरम्यान औषधे आणि घरचे जेवण देण्यास न्यायालयाने परवानगी दिली. परंतु न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना रुग्णालयात दाखल करू नये. तसेच, कोणतीही विशेष वागणूक देऊ नये, असे न्यायालयाने पोलिसांना बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! मान्सून २ दिवसात केरळात दाखल होणार, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिले अपडेट

Hidden Village: इतिहास बाहेर आला! महाराष्ट्रात 74 वर्षांपासून पाण्याखाली दडलेलं गाव अचानक समोर; पर्यटकांची झुंबड, Viral Video...

El Nino Impact : कोकणातील शेतकऱ्यांवर 'एल निनो'चे महाकाय संकट! आंबा-काजूनंतर आता खरीप हंगामही धोक्यात? कृषी विभागाने दिला इशारा

Chaloba Temple Ban : चंदगडमधील प्रसिद्ध चाळोबा देवस्थान परिसरात पर्यटकांवर बंदी; धार्मिक पावित्र्य अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Solapur Highway Accident: काम आटोपून घरी निघाले, पण परतलेच नाहीत; डंपरच्या धडकेत पेंटरचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT