कात्रज : कोरोना महामारीमुळे ज्याप्रमाणे आपल्या घराचे बजेट ज्या पद्धतीने कोलमडले आहे. अगदी त्याच पद्धतीने राज्याचेही बजेट कोलमडले असल्याने निधीची कमतरता जाणवत असल्याचे मत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त करत एकप्रकारे कात्रजकरांच्या प्रश्नांच्या मुद्द्याला बगल दिली. कात्रज परिसरातील ईच्छापूर्ती गणेश मंदिर ते भगवा चौकापर्यंतच्या नवीन रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर, नगरसेविका अमृता बाबर, गिरीश शहा, मंगेश पोखरकर आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्यांच्या कामाच्या लोकार्पण सोहळ्यांसह आमदार निधीतून देण्यात आलेल्या १ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी भागातील समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्यांना उत्तरादाखल बोलताना तुपे म्हणाले, कोरोनातून सावरत असताना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, कात्रजच्या विकासाचा अणुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कात्रजच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून शासन दरबारी समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत बीडीपी आरक्षणाच्या प्रश्नाव्यतीरिक्त अन्य प्रश्नांसाठी कोरोनाचे उत्तर तुपे यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेविका बाबर यांनी कात्रजमधील विविध समस्या सोडविण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर, नमेश बाबर यांनी कात्रजचा विकास होण्याची गरज असून कात्रजमधील(katraj) वाहतूककोंडी, पाणीप्रश्न, (traffic and water problems)आरक्षित जागेचे प्रश्न मांडताना शहराच्या तुलनेत विकास होत नसल्याची खंत व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.