MLA Madhuri Misal Sakal
पुणे

MLA Madhuri Misal यांना खंडणीची मागणी; पैसे न दिल्यास दिराच्या खुनाची धमकी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर खंडणी न दिल्यास त्यांचा दीर बाबा मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्याही मोबाईलवर मेसेज करून दोन ते पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(MLA Madhuri Misal Demand for Ransom)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान समीर शेख या व्यक्तीने बाबा मिसाळ यांच्या मोबाईलवर तसेच माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर मेसेज केले. या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन ते पाच लाख रुपयांची वारंवार मागणी केली. हे पैसे न दिल्यास फिर्यादी मिसाळ यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली. आरोपी दररोज मेसेज करून त्रास देत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर इमरान समीर शेख (रा. 79, विकास नगर, घोरपडी गाव) याच्यावर बिबवेवाडी पोलिसांनी आयपीसी 386, आयटी ॲक्ट कलम 66 (सी) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख विरुद्ध अशाप्रकारचे गुन्हे चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT