MNS activists Placed Board on pune Aurangabad st bus for demanding renamed as sambhajinagar 
पुणे

पुणे-औरंगाबाद एसटीवर झळकले संभाजीनगरचे फलक; मनसेचे कार्यकर्ते आक्रमक

सकाळवृत्तसेवा

शिरूर : औरंगाबादच्या नामांतराच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्यानंतर, शिरूरमधील मनसैनिकांनी शिरूर बसस्थानकात येणाऱ्या पुणे-औरंगाबादच्या 15 एसटी बसेसवर संभाजीनगरचे फलक झळकावले. "औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे', "छत्रपती संभाजी महाराज की जय'च्या अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी बसस्थानकाचा परिसर दणाणून सोडला.

हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या

औरंगाबादच्या नामांतराचा विषय राज्यस्तरावर गाजत असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाजीनगर नावाला पाठिंबा दर्शविल्यानंतर, मनसैनिकांनी ठिकठिकाणी बसेसवर संभाजीनगरचे फलक झळकावले. मराठवाड्याहून पुण्याला जाणाऱ्या बसेसचे शिरूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. यावेळी मनसेचे झेंडे फडकावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असोच्या घोषणांनी मनसैनिकांनी बस स्थानकाचा परिसर दणाणून सोडला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे जनहित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे, मनसे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष विजय ऊर्फ लाला जगधने, ललित गुगळे, साहिल काटे, प्रशांत ठुबे, कमलेश दरेकर, आदेश लालबिगे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT