Raj Thackeray  Sakal
पुणे

राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर; शहर मनसेतील खदखद दूर करणार?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा उद्यापासून पुण्याच्या (Pune) दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय रविवारी मनसेच्या (MNS) पार पडलेल्या मेळाव्या संदर्भातदेखील राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातील या दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे. तर, दुसरीकडे आगामी काही दिवसात पुण्यामध्ये राज यांची आणखी एक जाहीर सभा होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Raj Thackeray Pune Tour)

दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी रज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर उत्तरसभेत आणि औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेतदेखील त्यांनी मनसे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले होते. जदरम्यान, राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये पुणे मनसेमधील खदखद दूर करण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात होणार 'राज' सभा?

दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जाहीर सभा घेण्याची चर्चा देखील पुणे मनसेमध्ये जोरदार सुरू आहे. नुकतीच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सभा पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीसांपाठोपाठ आता राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या सभेबाबत चर्चा होऊ शकते अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली असून, यासभेसाठी मनसेकडून पोलिसांना पत्र देत परवानगी मागण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT