vasant more mns 
पुणे

मला प्रभागात शांतता हवीय, मनसे पुणे शहराध्यक्षांनी धुडकावला राज ठाकरेंचा आदेश

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर होताच, शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला. मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश ठाकरेंनी दिले. यानंतर राज्यात धार्मिक द्वेष वाढीस लागत असल्याचं बोललं जातंय.

मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलंय. (Raj Thackeray)

राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याचं मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं. मशिदीवरील भोंगे काढणार नाही. तर हनुमान चालीसा लावणार, असं राज ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असं ते म्हणाले.

आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात. राज साहेबांच्या आदेशानंतर त्यांनी हनुमान चालिसा लावली. मात्रस मी माझ्या प्रभागात असं काही करणार नाही, असं मोरेंनी स्पष्ट केलं. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही, असं पुणे शहर मनसे प्रमुख वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT