MNS leader Vasant More son threatened unknown persons 
पुणे

Vasant More: खंडणी द्या अन्यथा गोळी घालू... वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. 'खंडणी द्या अन्यथा गोळी घालू' अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (MNS leader Vasant More son threatened unknown persons)

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश मोरे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. ३० लाख दे नाहीतर मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करण्यात येईल. अशा आशयाचा मेसेज त्यांना आला आहे. याप्रकरणी भारती पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

रुपेश मोरे यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर अन्फियाशेख या मुली सोबत विवाह झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे.

ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवून ‘हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना नही तो आपके उपर रेप के केस कर देंगे’ असा धमकीचा मेसेज रुपेश मोरे यांना करण्यात आला आहे.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला ‘मै अल्फिया शेख 30 लाख रुपये नही दिये तो रेप के केस मे अंदर कर दुंगी’अशा पद्धतीचा मेसेज पाठवला गेला.

पुन्हा काही दिवसानंतर ‘दे रहा है क्या पैसा नाही तो मार दूंगा तेरी पुरी सेटिंग हुई है बहुत जल्द मार देंगे तेरे को गोली मार के जायेंगे तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’ असा धमकीचा मेसेज करून तीस लाख रुपयांची मागणी केली आहे.

यापुर्वीही रुपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने रूपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती. चिठ्ठीत 'सावध रहा रूपेश' असा मजकूर लिहण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT