Vasant More Esakal
पुणे

Vasant More : स्थान नाही? राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात वसंत मोरे तासभर उभेच

गेल्या काही दिवसांत पुणे मनसेमध्ये अंतर्गत कलह दिसून येत आहे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांत पुणे मनसेमध्ये अंतर्गत कलह दिसून येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतान राज ठाकरे काही सल्ले देतानाच सूचनाही करत आहेत. ते सध्या पक्ष बांधणीवर लक्ष देत आहेत. राज्यातील इतर शहरांपेक्षा पुण्यावर राज ठाकरे यांनी जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे मनसेत धूसफूस सुरू असल्याचं दिसून येतं आहे. अशातच गेल्या काही मनसेचे नेते वसंत मोरे यांना डावलण्यात येत असल्याच्या ते पक्षात नाराज असल्याच्या आणि पक्षांतर्गत वाद सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. वसंत मोरे यांना कालही हे दिसून आलं आहे. काल राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात जवळजवळ तासभर ताटकळत उभं राहावं लागल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे पक्षातील इतर पदाधिकारी बसलेले असताना वसंत मोरे यांच्या सारखा प्रमुख नेता उभं राहिला. या घटनेमुळे मनसेत मोरे यांची अवहेलना सुरूच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

काल प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज ठाकरे प्रमुख वक्ते असल्यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. वसंत मोरेही आपल्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला हजार राहिले होते.

कार्यक्रमामध्ये वसंत मोरे यांना हॉलमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे वसंत मोरे यांनी उभं राहून कार्यक्रम पाहिला. तासभर वसंत मोरे उभ्याने कार्यक्रम पाहात होते. विशेष म्हणजे वसंत मोरे जिथे उभे होते, त्या पहिल्या रांगेमध्ये मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसलेले होते. आपल्या बाजूला पक्षाचा मोठा नेता उभा आहे, हे माहीत असूनही एकाही पदाधिकाऱ्याने उठून उभा राहिला नाही किंवा त्यांनी वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नाही.

वसंत मोरे यांना कार्यक्रम संपेपर्यंत उभंच राहावं लागलं. वसंत मोरे यांना आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बसायला जागा दिली नाही. यावरून पक्षामध्ये वसंत मोरेंची पक्षात अवहेलना सुरू असल्याची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mexico Blast: भीषण! सुपरमार्केटमध्ये भयंकर स्फोट; २३ जणांचा मृत्यू, ४ चिमुकल्यांचाही समावेश, १२ जण जखमी

World Cup 2025 Final: पाऊस असाच सुरू राहिला तर २०-२० षटकांची होईल फायनल! जाणून घ्या कधी व किती वाजता लागू होईल हा नियम...

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! लाखो रुपयांचा पगार मिळणार; 'असा' करा अर्ज

VIDEO : मुद्दे मी देतो, तुम्ही आंदोलन करून दाखवा! 'मॅनेज झाले' म्हणणाऱ्यांना बच्चू कडूंनी चांगलंच झापलं, नेमकं काय दिलं उत्तर? वाचा...

Jalgaon Cooperative Bank : सहकारी बँकांमध्ये 'मर्जीतील' भरतीला ब्रेक! खडसेंच्या तक्रारीनंतर शासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT