Raj Thackeray esakal
पुणे

पुण्यात मनसे सदस्य नोंदणीला जोरदार सुरूवात; राज ठाकरे काय म्हणाले वाचा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला पुण्यातून सुरूवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

(MNS Member Registration Campaign)

"यावेळेला जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये माझे भाषणं असतील, महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी सदस्याला आमच्याकडून देण्यात येणार आहेत, या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं पहिलं नाव नोंदवलं आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं." असं अवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मंगळवारी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली असून, "आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो. पक्षाला चिन्हाची आणि नावाची गरज नसते विचारांचा वारसा लागतो" असं म्हणत शिवसेनेला बोचकारलं होतं. त्यानंतर आता मनसेने पुण्यातून आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Sports News: महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा शड्डू ऑलिंपिकमध्ये घुमेना, मराठी मल्ला मागे का पडतात?

Indian Theatre Documentary 1988 : भारतीय नाट्य परंपरेचा दस्तऐवज; जब्बार पटेल यांचा 'इंडियन थिएटर' लघुपट

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT