राज ठाकरे 
पुणे

राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर

नामदेव कुंभार

पुणे : पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार (ता. १९) पासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या काळात ते शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, तिथून ते पुण्यात येणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते राजेंद्र ऊर्फ बाबू वागस्कर, शहरप्रमुख वसंत मोरे यांनी शनिवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष गणेश सातपुते, रणजित शिरोळे या वेळी उपस्थित होते. सोमवारी (ता. १९) सकाळी वडगाव शेरी व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चतु:श्रुंगी मंदिरासमोरील इंद्रप्रस्थ कार्यालयात होईल. दुपारी कोथरूड व खडकवासला मतदारसंघाची बैठक माणिकबागेतील परिणय मंगल कार्यालयात होईल.

मंगळवारी (ता. २०) सकाळी हडपसर व कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची बैठक कोंढवा येथील लोणकर लॉन्सवर होईल. दुपारी कसबा व पर्वती मतदारसंघाची बैठक बिबवेवाडी येथील छत्रपती राजाराम महाराज सभागृहात होईल, असे वागस्कर यांनी सांगितले. या वेळी पक्षाचे शहर पदाधिकारी आणि विभागप्रमुख, उपविभागप्रमुख उपस्थित राहतील. मनसे आणि भाजप यांच्यातील युतीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेचे इंजिन एकटेच धावणार की भाजपसोबत याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT