mns vasant more 
पुणे

कोरोनामुळे मृत्यू, अॅम्ब्युलन्स अभावी अंत्यसंस्कारात अडथळा; मनसे नेत्यानं फोडली अधिकाऱ्यांची गाडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाची सोमवारी (ता.७) दुपारी तोडफोड केली. पालिकेच्या आवारात पार्क असलेल्या गाडीच्या काचा मसनेचे गटनेते वसंत मोरे यांनी फोडल्या.

शहरात कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. रुग्णांना रुग्णालयांत घेऊन जाण्यासाठी तसेच एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करायला नेण्यासाठी लवकर रुग्णवाहिका मिळत नाही. याच प्रकारामुळे चिडून जाऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत मोरे यांनी ही तोडफोड केली.

मोरे यांनी याबाबत सांगितले की, रविवारी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्याची मागणी त्याच्या कुटुंबाने पालिकेकडे केली होती. मात्र तीन तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे मृत्यू झालेल्या पुणेकरांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसेल, तर अधिकाऱ्यांना देखील गाडीत बसण्याचा अधिकार नाही. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी काय नियोजन केले आहे, असा प्रश्‍न देखील यावेळी मोरे यांनी उपस्थित केला.

मृत्यूनंतर तरी हाल करू नका :
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले. असे प्रकार सध्या दररोज घडत आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात नंबर लावावे लागत आहेत. जिवंतपणे त्यांना आरोग्याच्या चांगल्या सेवा प्रशासन देवू शकत नाही. मृत्यू झाल्यावर तरी किमान त्यांचे हाल करू नका, अशी विनंती मोरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Pune News: पुणे महापालिकेचा इंधनबचतीसाठी पुढाकार; वाहन वापरात ३० टक्के कपातीचा प्रशासनाकडून प्रस्ताव

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

Latest Marathi News Live Update : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नीलेश लंकेंनी घेतलं दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

SCROLL FOR NEXT