mns Vasant More appreciated contractor of Chandni Chowk bridge after bridge demolistion failed by blast  
पुणे

Chandni Chowk Bridge: पुण्याची सत्ता हाती आली तर...; 'त्या' ठेकेदारासाठीचं वसंत मोरेंचं ट्विट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : वाहतूकीसाठी अडचणीचा ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल रात्री स्फोट करून जमीनदोस्त करण्यात आला. दरम्यान हा पूल पाडण्यासाठी रविवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला. मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा काही भागच पडला. त्यामुळे एनएचएआय आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. सोशल मिडीयावर देखील याची मोठ्या प्रमाणाच चर्चा झाली. आता मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील पूलच्या मजबूतीबाबत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील या पुलाच्या पाडकामानंतर सर्वत्र या पूलाच्या कंत्राटदाराची चर्चा होतेय यामध्ये आता राजकीय नेत्यांनी देखील सहभाग घेतला आहे. वसंत मोरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "६०० किलो स्फोटक, १३५० होल, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी, गेल्या महिन्यापासून धावपळ, केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल, प्रचंड मोठी यंत्रणा, तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत"

"यावरुन एक मात्र फिक्स की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल! भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेन."

नेमकं झालं काय?

"आमचा अंदाज होता त्यापेक्षा जास्त स्टील या पूलाच्या बांधकामावेळी वापरण्यात आलं होतं. हे स्टील दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडांमध्ये फिक्स करण्यात आल्यानं स्टीलचं हे स्ट्रक्चर स्फोटानंतर पूर्णपणे खाली आलं नाही," असं एडिफाईज कंपनीचे मुख्य अभियंते आनंद शर्मा यांनी सांगितलं. हा ३० मीटर लांबीचा पूल पाडण्याचं काम एडिफाईज कंपनीला देण्यात आलं होतं.

पूल बांधला कोणी?

दरम्यान कंपनीच्या या स्पष्टीकरणामुळं एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की, ज्यावेळी सन १९९२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल बांधला त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे काम केलं आहे. त्यामुळेच हा पूल अत्यंत मजबूत असा बनला होता. कारण आज सुमारे १३०० स्फोटकं वापरुन स्फोट केल्यानंतरही तो पूर्णपणे खाली कोसळला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT