Mobile Dispensary uninterrupted service for needy patients in the city 
पुणे

Corona Virus : पुण्यात एका फोन कॉलवर मिळते मदत; गरजू रुग्णांसाठी 'मोबाईल डिस्पेन्सरी'

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनच्या कालावधीत गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना व आझम कॅम्पस मधील झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेज तर्फे पाच रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या मोबाईल डीस्पेन्सरीच्या माध्यमातून बुधवारी शहरातील 341 गरजू रुग्णांना उपचार सेवा देण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या उपक्रमा अंतर्गत कसबा पेठ, मोमिनपुरा, तोफखाना, राजीव गांधी नगर सारख्या विविध परिसरामध्ये ही सेवा पोहोचविण्यात आली. या वैद्यकीय पथकात २५ डॉक्टर्स नेमण्यात आले असून 15 एप्रिलपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असल्याची माहिती महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी दिली.

- बारामतीत फळविक्रेत्यांची मुजोरी; लॉकडाऊनचा नियम मोडत पोलिसांना धक्काबुक्की!
या वैद्यकीय उपक्रमासाठी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे असलेल्या युनानी महाविद्यालयातील पथकाला कामाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी डॉ.मुश्ताक मुकादम यांच्या नेतृत्वाखाली डॉ.ए.एच. फारुखी, डॉ.गजाला मुल्ला, डॉ.फौझिया फारुखी, डॉ.मंझूर अहमद, डॉ.शाहीन खान व नफीस शेख यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केला. या प्रसंगी डॉक्टरांना पोलिसांची मदत मिळत आहे.

- कधी सुधारणार पुणेकर?; विश्रांतवाडीत तब्बल एवढी वाहने पोलिसांनी केली जप्त
युनानी महाविद्यालयाच्या माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यानी या कोरोना विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले आहे. शासकीय यंत्रणेशी समन्वय करून हे पथक सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा,तपासण्या,उपचारांसाठी कार्यरत आहे,असे त्यांनी सांगितले.

- Corona Virus : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावी परत जाऊ द्या
आतापर्यंत येरवडा, भीमनगर, कोंढवा, शिवनेरीनगर आणि मध्यवर्ती पेठांमध्ये या पथकाने वैद्यकीय सेवा दिली. या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याशी 9922404536 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. इनामदार यांनी केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT