crime.jpg 
पुणे

नागरिकांशी बोलायचे नाटक करायचे अन्...

सकाळवृत्तसेवा
पुणे : रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांशी बोलून त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीचे महागडे 21 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. अटक केलेल्या चोरटयाने पुण्यासह कर्नाटकमध्येही मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले आहे.
 
मनोज यल्लापा मुदगल (वय 39) व  धर्मा तिम्मा भद्रावती (वय 26, दोघेही रा. डोबरवाडी, घोरपडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर गायकवाड (रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड हे रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजता सुखसागर येथे अंडी खरेदी करत होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका तरुणाने फिर्यादी यांच्या पाठीला हात लावून "तुम्हाला तिकडे कोणी तरी बोलावत आहे" अशी बतावणी केली.
 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
 
फिर्यादी यांनी पाठीमागे बघितले, त्यावेळी दुचाकीवरील तरुणाने त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून ते पसार झाले. त्यावेळी फिर्यादी यांनी गणेश राजापुरकर यांच्या दुचाकीवरुन चोरटयाचा पाठलाग करुन दुचाकीस्वार व चोरटयास पकडले. त्याचवेळी बीट मार्शल पोलिस कर्मचारी डाके व कोठावले यांच्याकडे सुपर्द केले. आरोपीच्या गाडीच्या डिक्कीमध्ये 21 महागडे मोबाईल जप्त केले. आरोपीने बिबवेवाडी, वानवडीसह कर्नाटकमध्येही चोरी केल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT