Modern poultry of native hens raised by tribal women
Modern poultry of native hens raised by tribal women 
पुणे

आदिवासी महिलांनी उभारली सुधारीत देशी जातीच्या कोंबड्यांची आधुनिक पोल्ट्री

डी. के वळसे पाटील

मंचर - डिंभे खुर्द (ता.आंबेगाव) येथील दया किसन केंगले व इतर एकूण ३५ लाभार्थी आदिवासी महिलांना विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत अंड्यावरील व मांसल देशी कुक्कुट पक्ष्यांचे बॅक यार्ड पोल्ट्रीसाठी २४ लाख ९९ हजार ९८० रुपये अनुदान हस्तांतरण करण्यात आले. ३१ लाख २५ हजार १५० रुपयांचा हा प्रकल्प आहे. महिलांना हक्काचा रोजगार मिळणार असल्याची माहिती घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी कैलास खेडकर यांनी दिली.

डिंभे खुर्द येथे पोल्ट्री शेडची पाहणी केल्यानंतर अनुदान रक्कम धनादेश खेडकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यापैकी सहा लाख २५ हजार १७० रुपये (२० टक्के) रक्कम लाभार्थी महिलांनी भरली. सुधारित देशी जातीच्या आठ आठवडे वयाच्या १०० तलंगा व १२ नर कुक्कुट पक्षी खरेदी केले असून प्रशस्त शेड उभारण्यात आले आहे. यावेळी निरीक्षक मुनेश्वर व सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे प्रतिनिधी दत्तात्रय दौंडकर, वास्तू विशारद मयूर दोशी, सागर मसुरेकर,ओंकार मोरडे व सर्व लाभार्थी उपस्थित होते. दया केंगले यांनी आभार मानले.

“ घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत महिला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी केली जाते. कुक्कुटपालनातून महिलांना खात्रीशीर आर्थिक उत्पन्न मिळते. सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांनी उत्कृष्ठ आत्याधुनिक बॅक यार्ड पोल्ट्री शेल्टर तयार केले आहे. याचा फायदा महिलांना होणार आहे. ही योजना विस्तृत स्वरूपात अधिकारी वर्गाने राबवली आहे.”

- कैलास खेडकर, एकात्मिक आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी, घोडेगाव (ता.आंबेगाव).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT