पुणे

पुणे शहराला १६ टीएमसी पाणी मिळावे - मोहन जोशी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिका हद्दीचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराला खडकवासला धरणातून हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळायला पाहिजे, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे. 

पुणे शहराला हे हक्काचे पाणी मिळावे याकरिता काँग्रेस पक्ष गेली काही वर्षे सातत्याने मागणी करत असून त्याकरिता पक्षाने संघर्षही केला आहे. या आंदोलनाची दखल भाजपला घ्यावी लागली होती. तेव्हा १३५० एमएलडीहून अधिक पाणी पुणे शहराला देऊ, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. प्रत्यक्षात तितके पाणी मिळाले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही काँग्रेस पक्षाने ही मागणी उचलून धरली होती. तीच मागणी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा करीत असून, पाण्याच्या प्रश्नाबाबत काँग्रेस पक्ष पुणेकरांबरोबरच राहील असे जोशी यांनी म्हटले आहे. 

पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश नुकताच झालेला असून अजून ३४ गावांचा समावेश होऊ घातला आहे. हा विस्तार पाहता १६ टीएमसी पाणी गरजेचे आहे. भामा-आसखेड धरणातून २.५ टीएमसी पाणी पुण्याला मिळणार आहे. त्यातून शहराच्या एका भागाची गरज भागेल. पण, संपूर्ण शहराचा विचार करता पुण्याला जादा पाणी आणि त्या पाण्याचे काटेकोर नियोजनाची गरज आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT