पुणे

केरळ किनारपट्टी मॉन्सूनने व्यापली

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. तर राज्यातही पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्याची शक्यता आहे.   

रविवारी (ता. ९) दुपारनंतर राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मृगसरींनी जोरदार सलामी दिल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीला वेग येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सांयकाळी जोरदार पाऊस पडला, जिल्ह्याच्या धरण परिसरातही चांगल्या सरी कोसळल्या. सातारा जिल्ह्यातही झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले भरून वाहिले, तर ऊस पिकाचे नुकसान झाले. सांगली मिरजेसह जिल्ह्यातील पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यांत पावसासह गारा पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात चिपळूण तालुक्यासह खेड, दापोली, गुहागर आणि संगमेश्‍वर तालुक्यांत झालेल्या पावसाने धूळपेरण्या केलेल्या बळिराजाला दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांत रविवारी रात्री चांगला पाऊस झाला. अकोले येथे सर्वाधिक ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान मॉन्सूनचा प्रवास अडखळत सुरू असून, यंदा तब्बल आठवडाभर उशिराने शनिवारी (ता. ८) केरळात आगमन झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १०) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह, लक्षद्वीप बेटांचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केली. केरळमधील कन्नूर आणि तामिळनाडूमधील मदुराईपर्यंत मॉन्सून दाखल झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह ईशान्य भारतातील मिझोराम, मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT