Monsoon
Monsoon Sakal
पुणे

मॉन्सूनची बंगालच्या उपसागरापर्यंत मजल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सूनला (Monsoon) पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण (Environment) तयार झाले आहे. अंदमानात मॉन्सून दाखल झाल्यानंतर शनिवारी (ता. २२) बंगालचा उपसागर (Bengal Sea) आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत त्याने मजल मारली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने मॉन्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात जोरदार पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Monsoon Enter in Bengal Sea)

भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टीवर ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर आणखी एका चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने येत्या बुधवारी (ता. २६) आणि गुरुवारी (ता.२७) हे चक्रीवादळ पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. हे चक्रीवादळ तीन दिवस असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे. ते बुधवारपर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये मंगळवारपासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असताना बंगालच्या उपसागरात व अंदमान सागरात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहू शकतात. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत ताशी ७० किमीची वेग पकडू शकतात.या चक्रीवादळामुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Party Anniversary : मुंबईमध्ये आवाज कुणाचा? दोन्ही शिवसेना आज वर्धापनदिनाला करणार शक्तिप्रदर्शन

Wayanad Loksabha Election : वायनाडवरून काँग्रेस-भाजपमध्ये वाक्‌युद्ध; भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा केला आरोप

BJP Party : नेतृत्वबदल नाहीच! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय

Sunil Tatkare : ‘राष्ट्रवादी’चे आमदार अजित पवारांसोबत

OBC Reservation : चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही - लक्ष्मण हाके

SCROLL FOR NEXT