Monsoon Sakal
पुणे

‘मॉन्सून’ने देश व्यापला

नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) देशात २१ मे रोजी आगमन झाले होते. त्यानंतर मॉन्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) (Monsoon) देशात २१ मे रोजी आगमन झाले होते. त्यानंतर मॉन्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला होता. दिल्लीसह संपूर्ण देश मॉन्सूनने व्यापल्याचे हवामान (Weather) विभागाने मंगळवारी (ता. १३) जाहीर केले. (Monsoon in India Rain)

पुरेसे अनुकूल हवामान नसल्याने वायव्य भारतात जवळपास महिनाभर मॉन्सूनचे आगमन लांबले. चालू वर्षी सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस उशिराने मॉन्सून देशभर पोहोचला आहे.

चालू वर्षी मॉन्सून आगमनाचा प्रवास सुरू झाल्यानंतर मे महिन्याच्या मध्यावर अरबी समुद्रात आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विषुववृत्ताकडून येणारे प्रवाह सुरळीत झाल्याने मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले. मॉन्सून केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली. हे चक्रीवादळ पश्‍चिम किनाऱ्याला धडकते तोच २१ जून रोजी बंगालच्या उपसागरात चाल करत मॉन्सूनने अंदमान निकोबार बेटांवर हजेरी लावली.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनला काहीकाळ गती मिळाल्याने वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान बेटांसह, दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप, कोमोरीन भागात मजल मारली. त्यानंतर मात्र वाऱ्यांची दिशा आणि ढगांची निर्मिती आणि पावसाचे प्रमाण कमी असल्याने केरळमधील मॉन्सूनचे आगमन लांबले. नियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये तीन जून दाखल झाला.

केरळात दाखल होताच, मॉन्सूनने उत्तरेकडे वेगाने प्रवास सुरू केला झाला. अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत मॉन्सून दोनच दिवसांत महाराष्ट्रात ५ जून रोजी दाखल झाला. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. जम्मू- काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोहोचणारा मॉन्सून यंदा १७ दिवस आधीच या भागात पोहोचला. त्यातच १३ जून रोजी ईशान्य भारतासह, पश्‍चिम बंगाल, बिहारसह पूर्व भारत, जम्मू- काश्मीरचा भाग व्यापूनउत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भागांत मॉन्सून पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT