Video Viral  Sakal
पुणे

पुणेकरांनो सावधान! ट्रेकला गेलेला तरूण पुराच्या पाण्यात गेला वाहून; घटनेचा थरारक Video Viral

ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका पर्यटन स्थळावर घडली आहे.

दत्ता लवांडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका पर्यटनस्थळावर फिरायला गेलेले पर्यटक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडल्याची घटना घडली. रविवारी ग्रुपने फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत हा प्रकार घडला असून अचानक झालेल्या पावसामुळे पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि अनेक पर्यटक अडकून पडले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ असलेल्या काळू वॉटरफॉल येथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून एका ओढ्यामध्ये पाण्याचा जोर वाढल्यामुळे पर्यटकांना परत येण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. तर तेथील स्थानिक लोकांकडून या पर्यटकांना मदत करण्यात आली. पण मदत करणारा एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

वाहून गेलेला तरूण सुखरूप असल्याची माहिती आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून ट्रेकिंगला जाताना असा खोडसाळपणा करणे किंवा अति शहाणपणा करणे टाळले पाहिजे असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना स्थानिक नागरिकांची मदत घेणे खूप गरजेचे असते. सह्याद्रीच्या कुशीत अशा अनेक अनोळखी नाले, नद्या आणि दऱ्या आहेत, त्या नवीन पर्यटकांना माहिती नसतात. त्यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडत असतात. त्याचबरोबर रस्त्याने जातानासुद्धा दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पर्यटकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT