Monsoon Sakal
पुणे

मॉन्सून शुक्रवारी अंदमानात येणार

गुजरातमध्ये मंगळवारी दाखल झालेले चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागताच दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गुजरातमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच नैॡत्य मोसमी वाऱ्याचा (मॉन्सून) (MOnsoon) प्रवास सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मॉन्सून शुक्रवारपर्यंत (ता. २१) अंदमान (Andaman) बेटांवर दाखल होण्याचा अंदाज आहे. तर रविवारपर्यंत (ता. २३) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा मॉन्सून नियमित वेळेआधी एक जूनपूर्वी ३१ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे जाहीर करतानाच, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलूक फोरमच्या’वतीने व्यक्त करण्यात आली आहे. (Monsoon will Arrive in the Andamans on Friday)

गुजरातमध्ये मंगळवारी दाखल झालेले चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागताच दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या भागात विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात असून, ढगांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. अंदमान निकोबार बेटांवर साधारणतः१८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो असतो. मात्र यंदा चक्रीवादळाने उशिराने मॉन्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. रविवारी (ता. २३) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाताना ही प्रणाली तीव्र होणार असून, मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे लवकरच मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव मंदावणार

‘तौक्ते’ अतितीव्र चक्रीवादळ सोमवारी (ता. १७) रात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून, जमिनीवर आले. हे वादळ गुजरातमध्ये घोंघावत असून, त्याची तीव्रता ओसरू लागली आहे. ही वादळी प्रणाली राजस्थानकडे सरकत जात आहे. त्यामुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज या वादळाचा प्रभाव आणखी कमी होऊन वाऱ्याचा वेग मंदावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजही बंद राहणार

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT