Mook Badhir person enter to the shop for donation and theft jewellery worth Rs 6 lakh 
पुणे

देणगी मागण्यासाठी मूकबधिर दुकानात आला आणि ६ लाखांचे दागिने घेऊन पळाला

सकाळवृत्तसेवा

पुणे  ः सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क करण्याच्या दुकानात देणगी मागण्यासाठी आलेल्या एका मूकबधिर व्यक्तीने भरदुपारी दुकानदाराची नजर चुकवून सहा लाख रुपये किमतीच्या दागिने असलेली बॅग पळविली. ही घटना 5 नोव्हेंबरला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास फडके हौद परीसरात घडली. 

याप्रकरणी रोहित सांडभोर (वय 31, रा. सेनापती बापट रस्ता) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फडके हौद परिसरात श्रीसिद्धनाथ हॉलमार्किंग सेंटर नावाचे दुकान आहे.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

फिर्यादी 5 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांच्या दुकानामध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क करण्यात व्यस्त होते. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पिस्ता रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅंट व डोक्‍यावर लाल टोपी अशी वेशभूषा असलेला एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानामध्ये आला. संबंधित व्यक्ती मूकबधिर असल्यामुळे ती फिर्यादी यांच्याशी हातवारे करून बोलत होती. त्याने फिर्यादी यांना एक मोठा कागद दाखवून अनेक मोठमोठ्या लोकांनी त्याला कशी देणगी दिली आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे तुम्हीही मोठी देणगी द्या, असे तो हातवारे करीत सांगत होता. 

त्यावेळी फिर्यादी यांच्याकडे हॉलमार्क करण्यासाठी आलेले पाच लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली एक प्लॅस्टिकची बॅग त्यांनी काऊंटरवर ठेवली होती. संबंधित व्यक्तीने फिर्यादीची नजर चुकवून दागिन्यांची बॅग चोरून नेली. देणगी मागण्यासाठी आलेली ती व्यक्ती गेल्यानंतर काऊंटरवर ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग त्या व्यक्तीने चोरून नेल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ फरासखाना पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी फिर्याद दिली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत. 

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT