corona recovery
corona recovery 
पुणे

एआयसीटीएस मधून 81 टक्के कोरोना रूग्ण बरे

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे, ता. 21 :औंध येथिल "आर्मी इंस्टिच्युट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स' (एआयसीटीएस) या रूग्णालयामध्ये तयार करण्यात आलेल्या आर्मी कोव्हिट सेंटरमधून 81 टक्के कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. या सेंटरमध्ये आता पर्यंत एक हजार 650 कोरोनाबाधितांना भरती करण्यात आले आहे. तर यातील एक हजार 333 रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. या रूग्णांमध्ये लष्करी जवान, पोलिस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांचा समावेश असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनातर्फे नुकतीच देण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग नसलेल्या रुग्णांना लष्कराच्या कमांड रुग्णालयात उपचार मिळावे या हेतूने एआयसीटीएस रूग्णालयात या स्वतंत्र 'आर्मी कोव्हिड सेंटर'ची निर्मिती करण्यात आली. या सेंटरमध्ये सैनिक व त्यांच्या कुटूंबियांबरोबरच पोलिस, शहर व परिसरातील रुग्णांना भरती करुन घेण्यात येत आहे. आतापर्यंत 322 हून अधिक नागरिक व 55 पोलिस कर्मचाऱ्यांचे उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. असे रूग्णालय प्रशासनाने सांगितले.

कोव्हिड सेंटरमधील व्यवस्था
- कोव्हिंड सेटरमध्ये 600 बेडची सोय
- यातील 400 बेड कोरोना बाधितांसाठी राखीव
- 20 बेड हे व्हेंटिलेटर तर 30 बेड अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रूग्णासांठी
- विलगीकरण कक्षसाठी 350 बेडची सुविधा
- रूग्णालयात डॉक्‍टर, पारिचारीका, पॅरामेडिकल आदी 90 कर्मचारी
- लक्षणे असलेल्या रूग्णांना रेमडेसिवीर लस किंवा इंटरफेरॉन बीटा 1 अल्फा औषध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT