dr rajendrasinh Sakal
पुणे

भूजल पुनर्भरणावर अधिक भर हवा; जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह

देशातील भूजलाच्या उपसात मोठी वाढ झाली आहे. परंतु त्या तुलनेत भूजल पुनर्भरण होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा धोका आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशातील भूजलाच्या उपसात मोठी वाढ झाली आहे. परंतु त्या तुलनेत भूजल पुनर्भरण होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा धोका आहे. हे टाळण्यासाठी जलनायकांनी आणि समाजाने भूजल पुनर्भरणावर अधिक भर दिला पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज (ता.१५) येथे व्यक्त केले.

मेनका प्रकाशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या अभिनव जलनायक या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, लेखक सतीश खाडे, प्रकाशक अभय कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विविध तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून पाणी या विषयावर काम करणाऱ्या १८ व्यक्तींच्या कार्याची दखल या पुस्तकात घेतली आहे. यावेळी या सर्व जणांचा अभिनव जलनायक या पुरस्काराने डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राजेंद्रसिंह म्हणाले, ‘‘पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला. पर्यायाने पाणी वापरात वाढ झाली. या तुलनेत पाण्याचे पुनर्भरण होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या उग्र रुप धारण करू लागली आहे. आपल्या पूर्वजांनी पाण्याचा वापर काटेकोरपणे केला. त्यामुळेच तर सध्याची पिढी आज त्याचा पुरेपुर लाभ घेत आहे. परंतु या पिढीने केवळ पाणी वापरून चालणार नाही तर, त्याचे पुनर्भरणही केले पाहिजे. तरंच कुठे पुढच्या पिढीसाठी पाणी मिळू शकेल. विज्ञान व तंत्रज्ञानाचा सुज्ञपणाने वापर केला तर, ते समाजासाठी वरदान ठरू शकते. नेमके हेच काम या १८ जलनायकांनी केले आहे. त्याचा समाजाला फायदा होईल. परंतु त्यांनी त्यांचे काम अधिक प्रमाणात वाढविले पाहिजे.’’

प्रकाशक अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या पुस्तकाच्या लेखनामागची भूमिका विशद केली. डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, लेखक सतीश खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पुरस्कार विजेत्यांनी प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला.

पाणी बचतीसाठी लोकसहभाग हा एक चांगला पर्याय आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून पाणी वापराबाबत जनजागृती होऊ शकते. शिवाय पाणी साठ्यामध्ये वाढ करता येते. राज्यात जलसंवर्धनासाठीची चळवळ उभी राहण्यास लोकसहभाग हा एक प्रमुख स्रोत ठरत आहे.याच्या माध्यमातून समाजाला

पाण्याचे जतन, संवर्धन आणि काटकसरीने वापर याचे महत्त्व कळू शकेल.

- डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT