Income 
पुणे

दारूपेक्षा 'या'मधून मिळतो अधिक महसूल; मुख्यमंत्र्यांकडे केली पत्राद्वारे मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्याचा महसूल वाढवण्यासाठी दारु विक्री सुरू करुन उपयोग नाही. यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मालमत्ता खरेदी- विक्रीमधून सरकारला महसूल मिळतो. त्यामुळे राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी त्वरीत दस्तनोंदणी कार्यालये त्वरीत सुरु करा, अशी मागणी पुण्यातील सूरज ईन्फो. प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक संजय डागा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

कोरोना विषाणू संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग मोठ्या संकटात आहे. आपल्याकडे कुठलाही प्रशासकीय अनुभव नसतानासुद्धा आपण राज्यातील कोरोना संकटाचा  धीरोदात्तपणे  मुकाबला करत आहात, हे प्रशंसनीय आहे. राज्यातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत  आहात. पण आज अचानकपणे कोरोनाच्या रेड झोनमध्येही दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारच्या  महसूलवाढीचे कारण दिले आहे. पण त्यापेक्षा दस्तनोंदणीतून अधिक महसूल मिळतो आहे. त्याला मात्र आपण परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता तरी आपण दस्तनोंदणी सुरु करावी, अशीही मागणी डागा यांनी केली आहे.

उदाहरणासह कारण द्यायचे झाल्यास, पुणे शहरात ७० लाख रुपयांचा एक फ्लॅट विकला तर सरकारला ६ टक्के स्टॅम्प ड्युटी (चार लाख २० हजार रुपये), नोंदणी शुल्क ३० हजार रुपये आणि जीएसटी असा एका ग्राहकामुळे सुमारे आठ लाख रुपयांचा महसूल सरकार मिळणार आहे. यउलट दारु विक्रीतून एवढा महसूल मिळण्यासाठी ८०० ग्राहक लागणार आहेत. सध्या लॉकडाऊन कालावधीत बांधकाम व्यावसायिक  घरे बांधू शकतात. पण विकू शकत नाहीत मग त्यांनी सप्लायर्स, कॉन्ट्रॅक्टर आणि मजूर यांना पैसे कसे द्यावेत. शिवाय अनेक व्यावसायिकांनी विविध बँकांमार्फत कर्ज घेतली आहेत. या कर्जाच्या व्याजदरात दोन टक्क्याने कपात करावी. कारण अर्थव्यवस्थेचा खरा कणा रिअल इस्टेट क्षेत्र असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT