कोरोना लस  File photo
पुणे

खासगी रुग्णालयात अवघ्या १९ दिवसांत २ लाखांपेक्षा जास्त जणांना लस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात गेल्या सहा महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना आत्तापर्यंत १२ लाख ७७ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू झाल्यानंतर गेल्या १९ दिवसांत २ लाख १३ हजार पेक्षा जास्त जणांचे लसीकरण झाले आहे. तर महापालिकेतर्फे केवळ ८२ हजार जणांना लस मिळाली आहे. (More than 2 lakh people have been vaccinated in a private hospital in just 19 days)

शहरात १८ ते पुढील वयोगटातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ३२ लाख आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणात लस मिळत नसल्याने अनेक नागरिक लसीसाठी प्रतिक्षेत आहेत. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्यासाठी २५ मेपासून परवानगी दिली आहे. शहरातील सुमारे दोन डझन रुग्णालयांमार्फत रुग्णालयात तसेच कंपन्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण केले जात आहे.

केंद्र सरकारच्या नियमानुसार महापालिकेच्या केंद्रांवर प्राधान्याने ४५ च्या पुढील वयाच्या नागरिकांसाठी दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सुरू आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील तरुण पैसे भरून लस घेण्यास प्राधान्य देत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

२५ मे ते १० जून या कालावधीत पुण्यात एकूण २ लाख ९५ हजार जणांचे लसीकरण झाले. त्यामध्ये महापालिकेच्या केंद्रांवर ८२ हजार ४०६ तर खासगी केंद्रांवर २ लाख १३ हजार ४३३ जणांनी लस घेतली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

केंद्र - कोव्हिशील्ड - कोव्हॅक्सिन - एकूण

शासकीय केंद्र - ६७, ९२७ - १४४७९ - ८२४०६

खासगी केंद्र -२, ०२,२५६ - ११, १७७ - २,१३,४३३

एकूण - २,७०,१८३ - २५,६५६ - २,९५,८३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT