corona1 
पुणे

जुन्नरमध्ये कोरोनाचे द्विशतक, चार जणांचा बळी

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातल कोरोनाबधितांच्या संख्येने द्विशतक पार केले आहे. काल रात्री उशिरा २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २१२ झाली आहे. यापैकी १२५ उपचार घेत असून, ८४ जण बरे झाले आहेत. औरंगपूर, मोकासबाग व आर्वी- पिंपळगाव येथील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपळगाव आर्वी येथे नव्याने ११ जण पॉझिटिव्ह आल्याने येथील संख्या १८ झाली आहे. बुधवारी जुन्नर व हिवरे बुद्रुक येथे प्रत्येकी ३, ओझर नंबर दोन-२, बस्ती, येडगाव, नारायणगाव, बेल्हे- गुंजाळवाडी, आळेफाटा, माणिकडोह, ओतूर येथे प्रत्येकी एक, अशा एकूण २६ रुग्णांची भर पडली. आज उदापूर येथे एक रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यातील विविध ३१ भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. आजअखेर १,७८२ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली असून, आज १०० स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बाहेरून आलेल्या ३५३२ जणांपैकी २६ संस्थात्मक, तर  ३५०६ होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

जुन्नर शहरात १६ रुग्ण  
प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर जुन्नर शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. काल एकाच दिवशी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर शनिवारी (ता. ११) ३, रविवारी (ता. १२) व सोमवारी (ता. १४) प्रत्येकी दोन, असे एकूण चौदा रुग्ण जुन्नर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर आढळून आले आहेत. त्यापूर्वी पहिला रुग्ण २५ जूनला, तर दुसरा २८ जूनला आढळून आला होता. सध्या १४ जण उपचार घेत असून, दोन जण बरे झाले आहेत.

 
Edited By : Nilesh J shende
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT