Gyanvapi Masjid Case sakal
पुणे

पुण्यातही 'ज्ञानवापी?'; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

पुण्यातल्या शनिवारवाडा, लालमहाल परिसरात मंदिरं पाडून मशिदी बांधण्यात आल्याचं मनसेनं म्हटलं असून याविरोधात भूमिका घेणार असल्याचंही सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच पेटला आहे. या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे. मंदिराच्या जागी ही मशीद उभारल्याचा दावा करण्यात आला आहे. आता पुण्यातही अशाच प्रकारे मंदिराच्या जागी मशीद उभी करण्यात आल्याचा दावा करण्यात आता आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Dargah constructed on temples in Pune claimed MNS)

पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच पुण्यातल्या या मंदिरांच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

काल पुण्यात मनसेची सभा झाली. या सभेत बोलताना अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वरालाही मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिल्जीचा बडा अरब हा सरदार पुण्यावर चाल करून आला, त्यावेळी त्यानं भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. फक्त एकच नाही तर पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरं उध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे तर दुसरं लालमहालाच्या थोडं पुढे आहे. आज तिथं छोटा शेख दर्गा आहे. सगळ्या मंदिरांच्या वर या मशिदी उभारण्यात आल्या आहेत.

अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका लावून धरली आहे. कालच्या सभेत मनसेने मशिदींवरचे भोंगे हटवण्याविषयीचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT