bhi.jpg 
पुणे

हदयद्रावक घटना : तिने आपल्या लेकीला कमरेला बांधले अन्...

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमा नदीवरील पुलावरून एका महिलेने आपल्या साडेतीन वर्षाच्या लहान मुलीसह नदीपात्रात उडी मारल्याने या मायलेकींचा बुडून मृत्यू झाला. लहानग्या लेकीला कंबरेला ओढणीने बांधलेल्या स्थितीत पाण्याबाहेर काढलेले मृतदेह पाहुन उपस्थितांचे डोळे पाणावले.

शिक्रापूर पोलिस तसेच पोलीस पाटील मालन गव्हाणे यांच्या फिर्यादीनुसार मिळालेली माहिती अशी, मृत महिलेचे नाव सपना मधुकर कसबे (वय २५, सध्या रा. सणसवाडी ता. शिरूर) असे असून सपनाने दुपारी कोरेगाव भीमा येथे भीमा नदीवरील जुन्या पुलावरून आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीला कमरेला ओढणीने बांधून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.

सायंकाळी उशिरा अग्निशमन यंत्रणा व स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या महिलेचा आपल्या आईशी वाद झाला होता, त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, तपासाअंती नेमके कारण कळु शकेल, असा प्राथमिक अंदाज तपासाधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांनी व्यक्त केला.

दरम्यान या मायलेकींचे मृतदेह शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व पोलीस पाटील मालन गव्हाणे यांच्या पुढाकाराने भीमानदीपात्रात चार वाजल्यापासून स्थानिक तरुण तसेच पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे जवान परिश्रम घेत होते. यात अभिषेक गोणे, चेतन खमसे, विशाल घोडे, किशोर काळभोर, पंकज माळी, प्रसाद जिवडे, ओम पाटील यांच्यासह सोनू भोकरे, बाबू भोकरे, भाऊसाहेब अजगर, सोमनाथ अजगर आदी स्थानिक तरुणांनी स्वतःच्या बोटीसह शोध कार्यात परिश्रम घेतले. शिक्रापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उपस्थितांचे डोळे पाणावले..
प्रत्येक माता आपल्या लहानग्याच्या रक्षणासाठी प्रसंगी जीवही पणाला लावते. येथे मात्र आपल्या लहानग्या लेकीला ओढणीच्या साहाय्याने कमरेला बांधून सोबतच जीवन संपवत, उराशी कवटाळलेल्या स्थितीतच पाण्याबाहेर काढलेले मायलेकीचे मृतदेह पाहुन उपस्थितांचे डोळे पाणावले. ही हदयद्रावक घटना समजताच गावातील महीलांनीही नदीकडे धाव घेतली. कुटुंबात असे नेमके काय घडले असेल की, या मायलेकींना आपला जीव नकोसा झाला, याबाबत महिलांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

क्षुल्लक कारणावरून वाद, लाथाबुक्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक; शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी; ठाण्यात काय घडलं?

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Pune PMPML Security: सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च, तरी आगारांत सुरक्षारक्षकच नाहीत; पीएमपीएमएलचा धक्कादायक कारभार उघड

SCROLL FOR NEXT