MP Dr Amol Kolhe is trying Aware people about Corona by Video 
पुणे

खासदार अमोल कोल्हेंमधील डॉक्टर झाला जागा ; व्हिडिओद्वारे कोरानाबाबत जनजागृती

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : आपले मूळ क्षेत्र बदलून समाजात कोणी कितीही मोठ्या पदावर गेला तरी, तो आपल्या मूळ पेशाला विसरत नाही, अशी समाजात धारणा आहे. याच धारणेचा प्रत्यय शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या कोरोनाविषयीच्या व्हिडिओमुळे येऊ लागला आहे. डॉक्टर ते राजकारणी असा प्रवास केलेल्या कोल्हेंमधील डॉक्टर कोरोनामुळे जागृत झाला आहे. यानुसार त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून कोरोनाची जनजागृतीबाबतचे वैद्यकीय समुपदेशन सुरू केले आहे.    

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप        ‌ ‌‌.
खासदार कोल्हे हे मूळचे वैद्यकीय पदवीधर (एम.बी.बी. एस.) आहेत. वैद्यकीय पदवीनंतर मुंबईत काही काळ त्यांनी वैद्यकीय सेवाही केलेली आहे. पुणे त्यांचा नाट्यक्षेत्र ते राजकारणी असा प्रवास झालेला आहे. नव्या क्षेत्रात प्रवेश केल्याने अर्थातच वैद्यकीय क्षेत्राला रामराम करावा लागला.    

 Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव   
       
सध्या पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे वारे सुरु आहे. यावर प्रभावी उपचार नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक गोंधळले आहेत. त्यामुळे या नागरिकांना समुपदेशन करण्यासाठी सुमारे साडेसहा मिनिटांच्या कालावधीचा व्हिडिओ कोल्हे यांनी तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये पुणे, मुंबईत  कोरोनाचा संसर्ग वाढण्याची कारणे, कोरोनाची लक्षणे, नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबतच्या उपाययोजना आणि याबाबत निर्माण झालेल्या शंका निरसन आदी मुद्द्यांवर समुपदेशन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT