dr Amol Kolhe
dr Amol Kolhe 
पुणे

अमोल कोल्हे यांनी मुजोर ठेकेदाराला असा शिकवला धडा...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) केबल तोडून पुन्हा "बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांनाच अरेरावीची भाषा वापरणाऱ्या मुजोर ठेकेदाराला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इशारा दिला. त्यामुळे मुजोर ठेकेदार वठणीवर आला आणि मागील तीन दिवसांपासून बंद असलेली जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव, पिंपळवंडी, खोडद परिसरातील "बीएसएनएल'ची सेवा आज सकाळपासून पूर्ववत झाली. 

नारायणगाव येथील जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगतच्या गटार लाइनच्या खोदाईचे काम सुरू आहे. मात्र, आमच्या कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने तीन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास येथील खोडद रस्त्यालगत जेसीबीने खोदाई केली. त्यात "बीएसएनएल'ची चारशे पेअरची केबल तुटली. त्यानंतर ठेकेदाराने लगेच पाइप टाकून व कॉंक्रिटीकरण करून तुटलेली केबल गाडून टाकली. त्यामुळे या भागातील सुमारे दोनशे फोन व ब्रॉडबॅंडसेवा विस्कळित झाली. त्यातून बॅंकेचे व व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले. 

"बीएसएनएल'चे अभियंता एस. पी. जोशी, डी. व्ही. मडके यांनी कॉंक्रिटीकरण काढून तुटलेली केबल काढून देण्याची वारंवार विनंती ठेकेदाराला केली. मात्र, मुजोर ठेकेदाराने अभियंत्यांनाच उलट अरेरावीची भाषा वापरली. विनंती करूनही ठेकेदार दाद देत नव्हता. त्यामुळे याबाबतची तक्रार त्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना शुक्रवारी (ता. 15) दुपारी केली.

त्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेऊन डॉ. कोल्हे यांनी ठेकेदाराला सुनावले. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या ठेकेदाराने शुक्रवारी रात्री दहा ते आज पहाटे तीन वाजण्याच्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून गाडलेली केबल काढून दिली. त्यानंतर आज सकाळी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने केबलची जोडणी करून विस्कळित झालेली सेवा पूर्ववत केली.

त्यामुळे मागील तीन दिवसांपासून ठप्प झालेले बॅंक, पतसंस्था व व्यापारी वर्गाचे व्यवहार सुरळीत झाले. डॉ. कोल्हे यांनी तातडीने दखल घेतल्यानेच हे शक्‍य झाल्याची भावना जोशी यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT