MP Girish Bapat Death esakal
पुणे

MP Girish Bapat Death: गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती मिळताच चंद्रकांत पाटील पुण्याकडे रवाना

रुपेश नामदास

Girish bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट यांना सध्या शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसीयूमध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ही माहिती समजताच कोल्हापुर दौऱ्यावर असलेले पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्याकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी विद्यापीठ येथील कार्यक्रम रद्द करून चंद्रकांत पाटील रवाना झाले आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुंबईतून पुण्याच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता आहे. तर कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर देखील दीनानाथ रुग्णालयात गिरीश बापट यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत.

खासदार गिरीष बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान बापटांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.

राज्यातील भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असतात. गिरीश बापट यांनी राजकारणाची सुरूवात जनसंघापासून केली. ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. नगरसेवकापासून राजकारण सुरू झाले. 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या पुणे लोकसभा मतदारसंघातून आजवरचा इतिहास मोडीस काढत गिरीश बापट खासदार झाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा ३ लाख २४ हजार ६०८ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळाविला. पुण्याच्या राजकारणात आजही बापटांचा दबदबा आहे. बापट यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : संसद परिसरात एनडीए, इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT