amol kolhe.jpg 
पुणे

खासदार कोल्हेंनी घेतला वाघोलीतील समस्यांचा आढावा

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे)  : खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी वाघोलीत काही ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याबाबत संबांधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. यानंतर अष्टापूर परिसरातही त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. डॉ. कोल्हे व आमदार पवार सतत वाघोली व परिसराला भेट देऊन आढावा घेत आहेत. गुरुवारी त्यांनी बकोरी रोड वरील निओ सिटी मधील नागरिकांशी संवाद साधला. वाघोलीत ग्रामपंचायत कडून पाणी पुरवठा होत नसल्याने सोसाट्याना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते.

निओ सिटी फेज 2 व 3 ज्या टँकर वाल्याकडून पाणी घेत होते. काही समस्या निर्माण झाल्याने त्यांनी त्या टँकरचा पाणी पुरवठा थांबविला. यामुळे त्या टँकर मालकाने निओ सिटी कडे जाणारा रस्ता अडविला होता. नंतर तो खुला करण्यात आला. या प्रकाराबाबत सोसायटी धारकांनी कोल्हे व पवार यांना सांगितले. कोल्हे यांनी त्वरित ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी  चर्चा केली. पाटील यांनी याबाबत सायंकाळी 5 वाजता बैठक बोलविली आहे. बकोरी रस्त्याबाबतचीही चर्चा करण्यात आली. मात्र, हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्याला वेळ लागणार आहे.

वाघोलीत टँकर माफियांचा अनेक सोसाट्यांना सामना करावा लागत असल्याची तक्रार यावेळी सोसायटी धारकांनी केली. सध्या कोरोनाचे संकट असल्याने प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहेत. सोसायटी कमिटी सोसायटी धारकांची काळजी घेत आहेत. मात्र असे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आम्हाला जाणवणाऱ्या समस्या आम्ही लोकप्रतिनिधींना सांगितल्या. त्यांनीही त्वरित संबांधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमच्या भागात मुख्यतः रस्त्याचा प्रश्न आहे. त्याबाबतही चर्चा झाली. सध्या कोरोनाचे संकट असल्याने सोसायटी धारकांच्या आरोग्याची काळजी घेणे कमिटीचे काम आहे. त्यानुसार आम्ही पाणी व अन्य पुरवठादार बदलत आहोत. मात्र, त्यानंतर सोसायटींची अडवणूक केली जाते.  हे योग्य नाही. गुरुवारी बकोरी रोड भागात चार कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे सोसाट्या अधिक सतर्क झाल्या आहेत.

- शिवाजी पोरे, चेअरमन निओ सिटी, सोसायटी. वाघोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT