mp sambhaji raje to protest for sarthi institute pune 
पुणे

सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे आक्रमक; घेतला मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा, कुणबी समाजातील तरुणांना दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेवर राज्य सरकारने निर्बंध लादल्याने या संस्थेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्या विरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती करणार संस्थेसाठी पुणे येथे आंदोलन करणार आहेत. शेकडो विद्यार्थ्यांसोबत 11 जानेवारीला संभाजीराजे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. याबाबत ते म्हणाले, 'सारथी प्रकरणात अनेकदा लक्ष घालून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करणार आहे."

FTII मधील PIFF चे चित्रपट प्रदर्शन रद्द कारण...
 

संस्थेतील कारभारावर आक्षेप घेत राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे संस्थेचा अर्थपुरवठा बंद झाला असून मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देखील मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच संभाजी महाराज यांनी सारथी संस्थेला भेटही दिली होती.

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणी भोसले दांपत्यावर गुन्हा दाखल

संभाजी राजे पुढे म्हणाले, ''सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. त्यानंतर , दुसऱ्याच दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत?''

पुणे मुंबई मार्गाने प्रवास करताय? जाणून घ्या महत्वाचे वाहतूक बदल

आज मला जाणीव झाली आहे की, ''लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. 11 जानेवारी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथीच्या लाभार्थ्यांसोबत बसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: बळिराजा सुखावला, खरिपाच्या पेरण्यांना वेग; अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाचे आगमन; काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Latest Marathi News Live Update : चार दिवसांच्या 'अंबुवाची महायोगा'नंतर गुवाहाटीतील कामाख्या मंदिराचे मुख्य द्वार उघडले, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीसाठी आर. अश्विनचा खास संदेश; म्हणाला 'तो फक्त १५ वर्षांचा आहे, पण...

Police Sub Inspector Suspended : कोल्हापुरात महिला पोलिस उपनिरीक्षक निलंबित! 25 हजारांची लाच मागितली, पण त्या एका चुकीमुळं 'अशी' अडकली जाळ्यात

Solapur: कंटेनर मधुन एसी चोरणारी टोळी जेरबंद दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT