VIral Video Sakal
पुणे

Pune Student Attack : 'मी कोयता वरच्या वर पकडला अन्..' वाचवणाऱ्या मुलाने सांगितला घटनेचा थरार

सदाशिव पेठेत भरदिवसा ही थरारक घटना घडली आहे.

दत्ता लवांडे

Pune Student Girl Attack : पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी एका तरूणीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. एका तरूणाने कोयत्याने या तरूणीवर वार केले असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर एका विद्यार्थ्याने या विद्यार्थिनीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याने घडलेला घटनेचा थरार सांगितला आहे.

"मी अभ्यासिकेत जात असताना मला हा तरूण तरूणीवर हल्ला करताना दिसला. मग तो तिच्या पाठीमागे पळत होता. ती पुढे जाऊन खाली बसली आणि मदतीसाठी हाक मारत होती पण कुणीच तिच्या मदतीला आलं नाही.

तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पकडला आणि बॅग त्याच्या अंगावर फेकली. त्यानंतर माझ्या मदतीला एकजण आला आणि आम्ही दोघांनी पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं" असं सदर विद्यार्थ्याने सांगितलं आहे.

दरम्यान, "दर्शना पवार या तरूणीची हत्या झाल्याची घटना होऊन एक आठवडासुद्धा झाला नसताना अशा घटना आज पुण्यातील मध्यवर्ती भागात घडत आहेत आणि मुलींना वाचवण्यासाठी कुणीच समोर येत नाही, अशा समाजाची मला लाज वाटते" अशी संतप्त प्रतिक्रिया या तरूणाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT