MPSC_Library 
पुणे

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; काय केली मागणी?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नसणाऱ्या भागातील अभ्यासिका सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन एमपीएससी स्टुडंटस् राइट्सच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

राज्यात विविध जिल्ह्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. आता स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी खूप कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये सरकारने अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे.

अभ्यासिका सूरू करण्यासाठी स्वतंत्र नियमावली असावी. यामध्ये अभ्यासिकांचे दररोज निर्जंतुकीकरण करावे, येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्माडिटेक्टरद्वारे तपासणी व्हावी, मास्क अनिवार्य करावे, प्रत्येक विद्यार्थ्यांने सँनिटाझर आणावे, उमेदवारांचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेऊन माहिती संकलित करावी, अशा स्वरूपाची नियमावली करून अभ्यासिका सुरू करण्याला परवानगी द्यावी, असे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT