vij.jpg 
पुणे

महावितरणने वीजग्राहकांना केले 'हे' आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे : पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे या काळात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटणे, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. 

अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्‍स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्‍यता पावसाळ्यात वाढते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे व सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामुळे वीजखांब वाकतात. वीजतारा तुटतात. लोंबकळत अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्‍यता असते. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

तसेच पावसाळ्याच्या कालवधीत पूर किंवा अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाविरणकडून करण्यात आले आहे. 

काय काळजी घ्यावी 
- स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही. 
- घरातील वीजपुरवठ्याला आवश्‍यक अर्थींग केल्याची खात्री करून घ्यावी. 
- घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा ऍण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. 
- ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. 
-विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही. 
- विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डपासून बंद करावे. 
- विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. 
- दूचाकी टेकवून ठेवू नये. 
- वीजतारांजवळ कपडे वाळत घालू नयेत. 
- सार्वजनिक ठिकाणी असलेले फिडर पिलर्स, रोहित्र किंवा इतर वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे करा तक्रार-  
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल ऍप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER हा एसएमएस वितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT