Mahavitaran
Mahavitaran 
पुणे

महावितरणचे ढिसाळ नियोजन, आंबेगावातील गावे दहा तास अंधारात  

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, गावडेवाडी, भोरवाडी, शेवाळवाडी, तांबडेमळा व १५ वाड्यावस्त्यांवरील वीजपुरवठा तब्बल १० तास खंडित झाला होता. त्यामुळे पिठाच्या गिरण्या, नळपाणी पुरवठा योजना बंद होत्या, तसेच आॅनलाईन पद्धतीने सरकारमान्य दुकानातून दिली जाणारी धान्यवितरण व्यवस्थाही बंद पडली होती. या गैरसोयीमुळे नागरिकांनी व व्यावसायिकानी संताप व्यक्त केला आहे.

मंचर वीज उपकेंद्रातून फिडरद्वारे अवसरी खुर्द परिसरातील ५ गावे व १५ वाड्यावस्त्यांना वीज पुरवठा केला जातो. मंचर वीज उपकेद्राबाहेर सोमवारी (ता. १) पहाटे तीनच्या सुमारास विजेच्या वाहिन्या तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीसाठी अवसरी खुर्द जनमित्रांनी ताबडतोब किवा सकाळी ६ वाजता येणे अपेक्षित होते. पण, दुरुस्तीचे काम सकाळी साडेआठ नंतर सुरु झाले. साहित्याची जमवाजमव करण्यात वेळ गेला. सकाळी साडेअकरा वाजता वीज पुरवठा सुरु झाला. पण, पुन्हा मंचर शहरातील जनमित्रांनी वीज उपकेंद्राबाहेरील झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी अवसरी खुर्द फिडर व मंचर फिडर दुपारी दोन वाजून वीस मिनिटाने बंद केला. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर दोन तासानंतर अवसरी खुर्द व मंचरचा वीजपुरवठा सुरु केला. 

अवसरी खुर्दचे जनमित्र वीजवाहिन्या दुरुस्त करत होते, त्यावेळीच मंचरच्या जनमित्रांनी व अधिकार्यांनी झाडाच्या फांद्या तोडून टाकल्या असत्या, तर अवसरी खुर्दचा दोन तास वीज पुरवठा बंद प्रकार टाळता आला असता, असे उद्योजक मिलिंद खुडे व आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, गेली पाच दिवस अवसरी खुर्द परिसरातील गावांमध्ये लॉकडाउन होता. सोमवारी लॉकडाउन शिथिल झाला. पण, वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे अनेकांना व्यवसाय बंद ठेवावे लागले. कामगारांनाही माघार जावे लागले. मंचर शहरात दुरुस्तीचे काम निघाल्यानंतर अवसरी खुर्दचाही फिडर नेहमी बंद ठेवला जातो. याबाबत उपाययोजना करावी. पावसाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गावकरी निवेदन देणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT