mukta tilak husband Shailesh tilak on kasba Peth By-Election candidature from bjp pune Assembly bypoll  
पुणे

Kasba Peth By-Election : कसब्यात अद्याप भाजपकडून उमेदवारी नाही; पण मुक्ता टिळकांचे पती म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या नेत्या आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता कसबा पेठेतील या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यादरम्यान टिळक कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुक्ता टिळक यांच्यानंतर आमचाच घरात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पण उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी दिली आहे.पुढे बोलताना शैलेश टिळक पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील असेही म्हणाले आहेत.

मुक्ता टिळकांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केलं आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा,असेही शैलेश टिळक म्हणाले.

शैलेश टिळक निवडणूक लढवणार?

कसबा पेठ मतदारसंघातून भाजपसाठी निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर बोलतना शैलेश टिळक म्हणाले की, जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी ही निवडणूक लढणार, मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे, कुणाल देखील चांगलं काम करत आहे त्यामुळे आम्हालाच उमेदवारी मिळावी असे शैलेश टिळक म्हणाले आहेत.

निवडणूक बिनविरोध नाहीच..

मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. परपरांगत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असून ही जागा काँग्रेस लढवणार आहे.लवकरच उमेदवाराचे नाव जाहीर होईल.

पोटनिवडणूकीचं मतदान कधी?

पुण्यातील या पोटनिवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT