Natraj natya Kala Mandal Sakal
पुणे

नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या

बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या.

सकाळ वृत्तसेवा

बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या.

बारामती - येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या.

बारामतीतील नगरपरिषदेच्या मालकीची तीन हत्ती चौकालगत मनोरंजनात्मक हेतू करिता नियोजित असणारी जागा बारामती नगरपरिषदेने ठराव करून नटराज नाट्य कला मंडळाला दिली आहे.

याबाबत येथील सुरेंद्र जेवरे व राहुल कांबळे यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. यामध्ये न्यायालयात बाजू मांडताना याचिकाकर्त्यांनी नटराज नाट्य कला मंडळ ही संस्था अस्तित्वातच नसून संस्थेचे बारामती व परिसरामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे योगदान नाही असे म्हटले होते.

यावर संस्थेच्या वतीने बाजू मांडताना नटराज नाट्य कला मंडळाच्या स्थापनेपासून ते कोरोना काळामध्ये केलेल्या कामापर्यंतचा अहवाल पुराव्यानिशी वाचून दाखवण्यात आला. याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रसन्न बी. वऱ्हाळे व किशोर सी. संत या खंडपीठाने निर्णय देताना नटराज नाट्य कला मंडळाला दिलेली जागा ही योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच देण्यात आल्याचा निष्कर्ष काढत मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने तळेकर अँड असोसिएट्स व ॲड. सुशांत प्रभुणे या वकिलांनी बाजू मांडली होती तर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने ॲड. अभिजीत पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

नटराज नाट्य कला मंडळ यासंस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी अंतिम विजय नेहमी सत्याचा होतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT