Gajanan_Marne 
पुणे

गुंड गजानन मारणे रॉबिनहूड आहे का?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यावर समर्थकांसह मिरवणूक आणि हुल्लडबाजी केल्याचा आरोप असलेला आरोपी गजानन मारणे रॉबिनहूड आहे का, असा उपरोधिक सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता.२३) केला. तुरुंगातील बंदींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून न्यायालय पॅरोल देत आहे आणि तुम्ही मिरवणुका काढता, असे खडे बोलही खंडपीठाने सुनावले.

कुख्यात गुंड मारणे तळोजा तुरुंगात मागील कित्येक वर्षे खुनाच्या खटल्यात अटकेत होता. गेल्या महिन्यात त्याची निर्दोष सुटका झाली झाली त्यावेळी तुरुंगाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी मुंबई-पुणे प्रवासात सुमारे तीस मोटारींच्या ताफ्यासह मिरवणूक, घोषणाबाजी केली आणि टोलनाक्‍यावर हुल्लडबाजी केली. यावर टीका झाल्यावर पोलिसांनी आठ तक्रारी दाखल केल्या. तक्रारी रद्द करण्यासाठी मारणेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे यावर मंगळवारी सुनावणी झाली. याचिकेवर पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे.

दरम्यान, गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिकांना अटक केली आहे. तसेच जवळपास ३० हून अधिक आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. मारणेच्या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता, त्यामुळे नवी मुंबई, रायगड, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या मार्गाने प्रवास करणाऱ्या मारणेच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

मिरवणुकीनंतर पुणे पोलिसांनी मारणेला साताऱ्यात अटक केली. आणि महाराष्ट्र धोकादायक उपक्रम अधिनियम (MPDA) अंतर्गत मारणेची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT