Municipal-Bench
Municipal-Bench 
पुणे

महापालिकेने नागरिकांसाठी बसविलेली बाके नेमकी कुणासाठी?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सार्वजनिक ठिकाणी व महापालिकेच्या जागेत नागरिकांना बसण्यासाठी बाके ठेवण्यात येतात. हा नियम धाब्यावर बसवून पदाधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने अनावश्‍यक ठिकाणी बाके बसविली आहेत. हातगाड्या व हॉटेलमालकांनी व्यवसायासाठी बाकांची पळवापळवीच केली आहे. त्यामुळे बाकांचा वापर नेमका कोणासाठी, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वॉर्डातील उद्यानांत बाके बसविली आहेत. यासाठी स्वतंत्र तरतूद आहे. मात्र, उद्यान वगळता इतर ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या बाकांसाठी स्वतंत्र तरतूद नाही. वॉर्डात सुरू असलेल्या एखाद्या विकासकामांमधूनच स्थापत्य विभागाकडून बाके मागविली जातात. त्यासाठी सबटेंडरची पद्धत असून, एका बाकासाठी पाच हजार सहाशे रुपये द्यावे लागतात. रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर बाके बसविणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येक वॉर्डात मागेल त्याला बाकवाटप केले आहेत. आठही प्रभागांमध्ये शेकडो बाकांचे वाटप झाले आहे. याची महापालिकेत मोजदाद नाही. संत तुकारामनगर, अजमेरा कॉलनी येथे सोसायट्यांमध्ये बाके ठेवली आहेत. तर वाल्हेकरवाडी, बिजलीनगर येथे बैठ्या घरांबाहेर, टेरेसवर, हातगाडी दुकानदारांकडे, गॅरेज व हॉटेलचालकांकडे ही बाके आढळली आहेत. 

शेवटी भंगारात
वॉर्डात बाकांची गरज असल्यास नगरसेवक अर्ज करून तशी मागणी प्रभाग स्तरावर करतात. अधिकारी बाकांची जागा ठरवून ती बसवितात. बाके तुटल्यावर त्याची दुरुस्तीही होत नसल्याचे चित्र आहे. शेवटी अशी बाके भंगारात जमा होतात. शहरभर ठिकठिकाणी अशी तुटलेली मोडकळीस आलेली बाके पडलेली दिसतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT