Salary sakal
पुणे

Pune News : बालवाडी शिक्षिका, सेविका पगाराच्या प्रतिक्षेत

पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका व सेविकांना दर महिन्याला पगारासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका व सेविकांना दर महिन्याला पगारासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. आधीच तुटपुंजा पगारात हे कर्मचारी काम करत असताना मे महिन्याचा पगार अद्याप झालेला नसल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या शहरात बालवाड्या आहेत. तेथे सुमारे ८५० अंगणवाडी शिक्षिका, सेविका कार्यरत आहेत. तर रोजंदारीवर काम करणारे चतुर्थ श्रेणीतील सुमारे ४५० कर्मचारी आहेत. त्यांना गेल्या वर्षभरापासून १५ ते २० तारखेनंतर पगार दिला जात आहे. यासाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने शिक्षण विभाग, महापालिका आयुक्तांना वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बालवाडी शिक्षिका, सेविका पगाराबाबत चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी पाच तारखेच्या आत वेतन देऊ असे सांगतात, पण त्याची अंमलबजावणी केलीच जात नाही. त्यामुळे वेतनास उशीर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही युनियनने केली असली तरीही अद्याप कार्यपद्धतीत बदल झालेला नाही.

वेतनवाढीकडेही दुर्लक्ष

बालवाडी शिक्षिका, सेविकांना दर दोन वर्षानंतर १० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला आहे. त्यानुसार २०२० मध्ये एक पगारवाढ झाली. २०२२ मध्ये दुसरी पगारवाढ करणे आवश्‍यक होते, पण अद्याप त्याची कार्यवाही देखील सुरू झालेली नाही. बालवाडी शिक्षिकेला १२ हजार ५०० तर सेविकेला ९ हजार ५०० रुपये पगार आहे, असे रोहिणी जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांचा मूक मोर्चा

SCROLL FOR NEXT