Waterline found during Peshwa period sakal
पुणे

Pune News : रस्त्याच्या कामात सापडले पेशवेकालीन जलवाहिनी उच्छवास

तावरे बेकरी चौकात खोदकाम सुरु असताना रस्त्याच्या मध्यभागी जुने बांधकाम असलेली जलवाहिनी लागली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या पथ विभागातर्फे ट्रेझर पार्क ते शिवदर्शनपर्यंत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जेसीबीने रस्ता खोदत असताना रस्त्याच्या मध्यभागी पेशवेकालीन जलवाहिनीचा उच्छवास सापडला आहे. महापालिकेने या ऐतिहासिक वारशाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने त्याचे संवर्धन करण्याचे काम सुरु केले आहे.

पुणे महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणासाठी सहा पॅकेज तयार करून त्याची स्वतंत्र निविदा काढली आहे. पॅकेज एक मध्ये शहरातील ८ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यापैकी ट्रेझर पार्क ते शिवदर्शन चौक हा रस्ता आहे, यासाठी ८ कोटी रुपये खर्च येणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १२५ मिटर लांबीच्या रस्त्याचे काम झाले आहे.

महापालिकेतर्फे तावरे बेकरी चौकात खोदकाम सुरु असताना रस्त्याच्या मध्यभागी जुने बांधकाम असलेली जलवाहिनी लागली. अधिकाऱ्यांना याची तपासणी केली असता ही कात्रजच्या तलावातून शनिवारवाड्याला जाणाऱ्या पेशवेकालीन पाण्याच्या जलवाहिनीचे उच्छवास असल्याचे स्पष्ट झाले. या जलवाहिनीतून पाण्याचा प्रवाह सुर असल्याचेही यावेळी निदर्शनास आले.

कार्यकारी अभियंता अमर शिंदे म्हणाले, ‘तावरे बेकरी चौकात रस्त्याच्या मध्यभागी हा उच्छवास सापडला आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने तेथे योग्य पद्धतीने बांधकाम केले जाईल. तसेच तेथे माहितीफलक लावला जाईल.

श्रीकांत भागवत म्हणाले, ‘कात्रज तलावातून शनिवारवाड्याकडे पाणी येताना पेशव्यांनी अनेक ठिकाणी उच्छवास बांधले आहेत. त्यापैकी हा एक उच्छवास आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संपर्क साधला असून, योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आदिवासी बांधवांचा उद्रेक! बोरिवलीत पोलिसांवर केली दगडफेक; आंदोलनामागचं नेमकं कारण काय?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता; उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात जाणार? खासदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : माथेफिरुने शाळेत निघालेल्या दोन मुलींना विहिरीत ढकलले

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

SCROLL FOR NEXT