Municipal Corporation starts ration distribution in slums in containment zone In pune during Lockdown 
पुणे

झोपडपट्टीधारकांनो, चिंता करु नका! कन्टेन्मेंट झोनमध्ये महापालिकेकडून शिधावाटप सुरु

सकाळवृत्तसेवा

पुणे : प्रतिबंधित क्षेत्रातील (कन्टेन्मेंट झोन) कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्याचा चंग आता महापालिकेने बांधला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजे या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये पुणे महापालिकेच्यावतीने शिधा वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन ते चार हजार झोपडीधारकांना यांचे वाटप करण्यात आले आहे.

आणखी वाचा- पुण्याच्या सुपर आजीबाईंना, कोरोनाला हरवले 

लॉकडाऊनसह विविध उपाययोजना करून देखील पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषत: भवानीपेठ, ढोलपाटील, येरवडा, कसबा-विश्रामबाग वाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यातही झोपडपट्ट्यांच्या परिसरात या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो कसा रोखावा, असा प्रश्‍न महापालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे. त्यावर राज्याचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी तीन पर्याय सुचविले आहेत. त्यापैकी प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच शिधावाटप या पर्यायाची अंमलबजावणी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी कडकपणे व्हावी, यासाठी झोपडीधारकांना जीवनावश्‍यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या चारही क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात येणाऱ्या तसेच बाधितांची संख्या जास्त असलेल्या झोपडपट्ट्यांमधील सुमारे सत्तर हजार कुटुंबांना शिधावाटप करण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. कालपासून ही सुरवात झाली असून आतापर्यंत तीन ते चार हजार झोपडीधारकांना त्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे महापालिकेचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी सांगितले. 

पुणेकरांनो सावधान, या भागात वावरतोय बिबट्या

-प्रतिबंधित क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये शिधावाटपास महापालिकेकडून सुरवात 
-सत्तर हजार झोपडीधारकांना वाटप करणार 
-आतापर्यंत तीन ते चार हजार झोपडीधारकांना वाटपाचे काम पूर्ण 


काय वस्तूंचे वाटप होणार 
गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, पोहे, साखर, मीठ, तूरडाळ, अंगाचा व कपडे धुण्याचा साबण, दूध पावडर, चहा पावडर,मिरची पावडर आदी जीवनावश्‍यक वस्तू. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT