Pune Municipal
Pune Municipal Sakal
पुणे

PMC : ड्रेनेजच्या 5 हजाराच्या कामाला 28 हजार देण्याची गरज काय?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मैलपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) (Drainage Line) स्वच्छ (Clean) करण्यासाठी आता महापालिका (Municipal) प्रति मशीन २८ हजार रुपये असे १ लाख १६ हजार रुपये एका दिवसासाठी खर्च (Expenditure) करणार आहे. त्यासाठी चार जेटिंग विथ रिसायकल मशिन सात वर्षं भाडेकराराने घेण्याची सुमारे ३२ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया (Tendor) महापालिकेने सुरू केली आहे. मध्यंतरी जलपर्णी काढण्याची निविदा वादग्रस्त ठरली होती. त्यापाठोपाठ आता मैलापाणी वाहिनीतील पाण्यावर प्रक्रिया करून ती पुन्हा वाहिनीत सोडण्याच्या हे काम महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. (Municipal Corporation will spend so much for drainage cleaning in Pune)

एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचण दाखवून विकासकामांना कात्री लावली जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे उधळपट्टी कशासाठी केली जात आहे. नेमके कोणाच्या हितासाठी हा उद्योग सुरू आहे, असा प्रश्‍नही या निमित्ताने विचारला जात आहे. शहरातील मैलापाणी वाहिन्या पाच हजार रुपये भाडे दराने जेंटिंग मशिनच्या माध्यमातून साफसफाई करण्याचे काम केले जात आहे. असे असताना २८ हजार रुपये दराने हेच काम करण्याची गरज काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील ड्रेनेज लाइनची साफसफाई भाडेतत्त्वावरील १२ के.ल क्षमतेच्या ४ हायकपॅसिटी सक्शन पंप जेंटिंग विथ रिसायकल यंत्राने पुढील सात वर्ष करण्यासाठीची जाहिरात महापालिकेकडून काढण्यात आली आहे. सुमारे ३२ कोटी रुपयांचे हे काम आहे. या यंत्राच्या साह्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहे. प्रथमच अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या हेतूने ही निविदा काढण्यात आली आहे.

अनुत्तरित प्रश्‍न

शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या जायका प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम सुरू होण्याची शक्यता आहे, असे असताना पुन्हा त्याच कामासाठी हा खर्च का, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

शहारातील ४५० मिलिमीटर व्यासावरील ड्रेनेज लाइन स्वच्छ करण्यासाठी आपण या मशिन घेत आहोत. चार झोनसाठी या चार मशिन उपलब्ध करून देणार आहेत. जलनिस्सारण विभागाने शिफारस केल्यामुळे ही निविदा काढण्यात येत आहे.

- महेशकुमार डोईफोडे, व्हेईकल डेपो प्रमुख, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Latest Marathi News Live Update: व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT