Raviraj Tavare Sakal
पुणे

राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीच्या नेत्यावर माळेगावमध्ये गोळीबार

जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणी तावरे यांचे पती रविराज (वय ४१) यांच्यावर माळेगाव येथील संभाजीनगर येथे अज्ञात दोन लोकांनी गोळीबार केला.

प्रशांत पाटील

माळेगाव - माळेगाव-पणदरे (ता.बारामती) जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणी तावरे यांचे पती रविराज (Raviraj Tavare) (वय ४१) यांच्यावर माळेगाव येथील संभाजीनगर येथे अज्ञात दोन लोकांनी गोळीबार (Firing) केला. आज सायंकाळी पावणेसात वाजता वरील घटना घडली असून रविराज यांच्या छातीमध्ये एक गोळी लागल्याने ते गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. हा हल्ला राजकिय वैमनंशातून (Political Enemy) झाल्याचे जखमींच्या नातेवाईकांनी सांगितल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दादा जराड, समिर घोरपडे आदी कार्य़कर्त्यांनी जखमी रविराज यांना बारामती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी तातडीने दाखल केले. रविराज यांची प्रकृती सध्यातरी स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितली. (Murder attack on Raviraj Taware in Malegaon due to political enmity)

दरम्यान, माळेगाव बुद्रूक संभाजीनगर येथे रविराज व त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे आपल्या फोरव्हिलरमधून निघाले असता ते वडापाव घेण्यासाठी थाबले. त्याचवेळी त्यांच्यावर अज्ञात मोटारसायकस्वरांनी अचानकपणे येऊन गोळीबार केला व ते पळून गेले. हा प्रकार स्वतः रोहिणी तावरे यांनी आपल्या डोळ्याने पाहिल्याने त्या मोठ्याने ओऱडल्या असता समोर क्रिकेट खेळत असलेल्या मुलांनी रविराज यांना तातडीने वैद्यकिय उपचार मिळविण्यासाठी  बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पोचविले. त्या मदत कार्यात दादा जराड, समिर घोरपडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. या घटनेबाबत माहिती देताना जराड म्हणाले, की सुरवातीला आम्हाला वाटले रविराज यांच्या गाडीचा अपघात झाला, परंतु नंतर कळाले की त्यांच्यावर गोळीबार झाला ते. त्यांच्यावर कोणी गोळीबार केला, हे पाहण्यापेक्षा आम्ही रविराज यांना तातडीने पुढील वैद्यकिय उपचार मिळण्याला प्राधान्य दिले.` दुसरीकडे, वरील घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच त्यांनी बारामतीत वैद्यकिय उपचार घेत असलेले जखमी रविराज यांची प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यानच्या कालावधीत माळेगावसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्य़कर्त्यांनी बारामती हाॅस्पिटल परिसरात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल !

राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळविण्यात आली. त्यांनीही घटनेचे गार्भिर्य़ विचारात घेवून जखमी रविराज तावरे यांना तातडीचा वैद्यकिय उपचार मिळण्यासाठी संबंधित हाॅस्पिटलच्या प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. तसेच कायदा सुवेवस्था अबाधित राहण्याच्या पार्श्वभूमिवर पोलिस अधिक्षकांनाही सूचना देण्यात आल्या असून पुढील कार्य़वाही करण्यास सांगण्यात आले आहे, याचवेळी घटनेचे गार्भिय विचारात घेत आमदार रोहित पवार यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेत जखमी रविराज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. हा प्रकार गंभीर असून बारामतीत हे कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

रविराज यांच्या कार्य़कर्त्यांवरही यापुर्वी हल्ले...!

माळेगाव हद्दीत राजकिय दृष्ट्या रविराज तावरे यांचे कार्य़ सुरू असताना काही पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे टोकाचे वाद होते. या पुढील रविराज यांचे खंद्दे समर्थक नितीन तावरे, रियाज शेख यांच्यावरही रात्रीच्य़ावेळी गावातील काही लोकांनी हल्ला केल्याची पोलिस ठाण्यात नोंद आहे. या प्राप्त स्थितीचा विचार करता हा प्रकार कायदासुवेवस्थेला बादा आणणारा आहे, संबंधित आरोपींना कायद्याने कडक शासन केले जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी कळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT