Murder
Murder 
पुणे

किरकोळ वादातून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कौटुंबिक वादातून पतीने डोक्‍यामध्ये लोखंडी वस्तूने घाव घातल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना विश्रांतवाडी येथे घडली.

रमाबाई ज्ञानेश्‍वर गायकवाड (वय 35, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती ज्ञानेश्‍वर आबा गायकवाड (वय 40) यास हडपसर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड कुटुंब विश्रांतवाडीतील भीमनगर वसाहतीमध्ये राहते. पती-पत्नीमध्ये शुक्रवारी (ता.19) रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातूनच पतीने पत्नीच्या डोक्‍यात लोखंडी वस्तूचा घाव घातला. त्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच शनिवारी (ता.20) मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. पती-पत्नीमधील भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT