Murder of a senior woman at Sakori
Murder of a senior woman at Sakori 
पुणे

तीक्ष्ण हत्याराने वार करत वयोवृद्ध महिलेची हत्या; 5 तोळं दागिणे लुटून आरोपी पसार

अर्जुन शिंदे

आळेफाटा(पुणे) : साकोरी (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता.४) सेंटरिंगच्या कामाला नेण्याच्या बहाण्याने नेऊन एका परप्रांतीय व्यक्तीने एका जेष्ठ महिलेचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून खून केला तसेच संबंधित महिलेचे सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला आहे. दरम्यान आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधित परप्रांतीय आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, साकोरी येथे शुक्रवारी (ता.४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  जानकूबाई अर्जुन चोरे (वय - ६५ वर्षे) रा. साकोरी (चोरेमळा) या जेष्ठ महिलेस, परिसरातील बाह्मणमळा येथे भाड्याचे खोलीत राहण्यास असलेल्या एका परप्रांतीय व्यक्तीने सेंटरिंगच्या कामाला नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन गेला. दरम्यान संबंधित जेष्ठ महिला सायंकाळी घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली.

मैत्रिणींसाठी कायपण ! फिरायला घेऊन जाण्यासाठी चोरायचा महागड्या बाईक !

यावेळी संबंधित परप्रांतीय व्यक्ती राहात असलेल्या बाम्हणमळा येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने संशय आल्याने पोलीसांना कळविण्यात आले. संबंधित घरात ' जानकूबाई अर्जुन चोरे (वय - ६५ वर्षे) रा. साकोरी या जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तिच्या अंगावरील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधित परप्रांतीय आरोपी - अर्जुन शुभनारायण प्रसाद, सध्या रा. साकोरी (मूळ रा. खबशी, ता. बनीयापुर छप्रा, जि. सारंग - राज्य बिहार) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबतची फिर्याद बापु पांडुरंग साळवे यांनी, आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT