crime sakal
पुणे

पुणे : दारू पिताना झाला वाद; लोखंडी शस्त्राने वार करून केली हत्या

दत्तवाडी पोलिस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारू पिताना शिवीगाळ केल्याच्या रागातुन चौघानी तरुणावर धारदार लोखंडी शस्त्राने वार करुन खुन केला. हि घटना सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास दत्तवाड़ी येथे घडली. मंदार जोगदंड (वय 23, रा. साने गुरुजी वसाहत, आंबिलओढा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या खुळे,राजू कोतवाल, साहिल इजगद, चेतन बनसोडे( सर्व रा. दत्तवाड़ी) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी शुभम दत्ता अडसुळ (वय 23, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड व खुळे हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोमवारी रात्री ते दोघे व खुळे याचे साथीदार दत्तवाड़ी येथील सई हेरिटेज सोसायटीजवळ दारू पित बसले होते. त्यावेळी जोगदंड याने खुळे यास शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने जोगदंडवर खुळे व त्याच्या साथीदारांनी धारदार लोखंडी शस्त्राने वार केले. तसेच त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत जबर दुखापत झाल्याने जोगदंडला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यु झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT